Argentina vs France FIFA WC Final : प्रत्येक क्षणाला हृदयाचे ठोके वाढत होते. जसजसा सामन्याचा वेळ वाढत होता, तसतसा प्रत्येक सर्वांच्या नजरा मेस्सी (Lionel Messi) आणि एमबाप्पेकडे (Kylian Mbappe) जात होत्या. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये (Penalty shootout) गेला आणि अनेकांचे डोळे पाणावले. गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता. (Lionel Messi Reaction after FIFA World Cup final win marathi news)
अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina vs France ) पेनाल्टी शूटआऊटवर 4 - 2 असा विजय मिळवत तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. मॅजिकल मेस्सीने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल नोंदवत एमबाप्पेच्या पराक्रमाला सुरंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने थरारक विजय मिळवला आहे. गोन्झालो मॉन्टिएलने अखेर गोल केला आणि मेस्सीची रिअॅक्शन (Lionel Messi Reaction) पाहण्याजोगी होती.
पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा स्कोर झाला होता. आता फक्त एक गोल आणि 36 वर्षांचं स्वप्न पुर्ण होणार होतं. सर्वाच्या धडधड वाढत होती. त्याचवेळी गोन्झालो मॉन्टिएलकडे बॉल आला. त्याने गोलकिपरला हुकवत स्ट्रेट गोल केला आणि मेस्सी आहे तसा खाली गुडघ्यावर बसला. त्याला पुढे जावं की मागे जावं सुचेना. एका क्षणात मेस्सीचे (Lionel Messi Cry) डोळे पाणावले. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Messi's reaction when Argentina scored the last penalty to win the World Cup pic.twitter.com/DspHcC7hoO
— Italo Santana (@BulletClubIta) December 18, 2022
दरम्यान, स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने शानदार खेळ दाखवला. त्याने अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने 23 व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. त्यानंतर एक्सट्रा टाईममध्ये मेस्सीने (Lionel Messi Goal) आणखी एक गोल करत अर्जेंटिनाला जीवदान दिलं. तसेच पेनल्टी शूटआऊटचा पहिला गोल देखील मेस्सीने केला होता.